जाज्वल्य कुक्कुटधर्माची स्थापना !!!

होय, आता सहन होत नाही आणि आरवताही येत नाही या अवस्थेतून सगळा बहुजन कुक्कुट समाज बाहेर पडणार आहे. ( भरली ना काळजात धडकी ??)


उच्च्ववर्णीय कोंबड्यांनी युगानुय्गे केलेल्या अत्याचाराचा परिणाम म्हणून आमची अंडी छोटी झाली आहेत आणि ती पांढरीशुभ्रसुद्धा दिसत नाहीत.


पण आता आम्ही एकजूट झालो आहोत आनि जाग्रूत झालो आहोत. ही गुलामगिरी फेकून देउ, आनि नवा कुक्कुटधर्म स्थापन केला आहे त्याट सामील होउ.


तत्वे पुढीलप्रमाणे


१) हा धर्म समानता माननारा असेल, सर्व कोंबड्यांना प्रवेश मिलेल आणि समान वगनूक.
२) पांढऱ्या कोंबड्यांना वा पांढरी किंवा दोन इंचांहून अधिक लांबीची अंडी देणाऱ्या कोंबड्यांना कुक्कुटधर्मात प्रवेश नाही.
३) जुन्या समजूतीचे जोखड फेकून देने एकदम कम्पलसरी असेल.
४) फिकट पिवळ्या रंगाला यापुढे पांढरा असे म्हटले जाईल. पांढरा शुभ्र रंग असल्यास त्याला काळा असे संबोधले जाईल.
५) दोन इंचाहून अधिक मोठ्या अंड्यांचा आकार शून्य आहे असे गनले जाईल.
६) कर्मकांडाला अजिबात म्हनजे अजिबात विरोध. 
६) सकाली उठुन कुक्कुट स्तवन व रात्री झोपतांना कुक्कुट वंदना म्हटली पायजेल.
७) लांडग्यांचा या कुक्कुटधर्माला असलेला पाठीम्बा लक्षात घेता त्यांनी दोन चार कुक्कुट बांधव खाल्ले तरी दुर्लक्ष केले जावे. त्यांचा कुक्कुटक्रॉस हवे तर गळ्यात घालावा.
८) कुक्कुटमहर्शी वा ह काळोखे लिखित कुक्कुटसंहिता येत आहे, त्यात जगातले सर्व ज्ञान आहे तोपर्यंत सर्व जुनी पुस्तके ही निरुपयोगी व कुक्कुटविरोधी असल्याने दिसतील तिथे जाळून टाकाली जावीत.


(शक्य तितके अशुध लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, चुक भुल देणे घेने)