अफजल ची फाशी

ह्या महीन्याच्या २० तारखेला अफजला फाशी होईल, पण त्यांची फाशी रद्द व्हावी म्हणून जे जे प्रयत्न हे राजकीय लोक करीत आहे ते पाहून एकदमच सर्व निराशजनक वाटले. काही लोकांचे प्रतिवाद वाचले / दुरदर्शन संचावर पाहीले तेव्हा वाटलं खरोखरच त्यादिवशी ते अतिरेकी जर यशस्वी झाले असते व चार पाच नेते मंडळी ह्याना शहिद (?) केले असते अथवा त्याना ओलिस धरुन आपल्या साथीदारांना मुक्त केले असते अथवा काश्मीर चा हवा तसा निकाल वदऊन घेतला असता तर ह्या लोकांनी काय केले असते ? असेच वाद प्रतिवाद घातले असते की त्याने काही नाही केले त्याला फसवून / धमकावून ह्या कटात सामिल केले गेले अथवा त्यांने तर एक देखिल गोळी चालवली नाही तर त्याला  फाशी नको.


त्याच्या घरच्या लोकांनी केलेला प्रयत्न समजतो पण ह्या नेते मंडळी ना काय झाले आहे, अहो तो त्या कटाचा (संसदवरील हल्ला) भारतातील महत्त्वाचा बिंदू  ह्याच मानसाने त्या सर्व अतेरिकांना मदत व राहण्याची सोय करुन दिली, हत्यारे पोचवली. अश्या व्यक्तीला वाचवण्यासाठी ही राजकीय लोक का आपला वेळ व समाजाचा वेळ खात आहेत ? आज ही लोक त्यांच्या मुला-बायको विषयी दया दाखवा असे म्हणत आहेत पन त्यांचे काय ज्यांनी त्या हल्ल्यात आपला मुलगा, नवरा, वडिल गमावला ?


आपले मत व्यक्त करा...