पुदिन्याचा पुलाव (ग्रीन राईस)

  • २ वाट्या तांदूळ ,१ कांदा , चविप्रमाणे मीठ ,साखर , अर्धे लिम्बू , आले ,६-७ लसूण पाकळ्या ,पुदिना ,कोथिंबीर, तेल,५ वाट्या गरम पाणी
  • २-३ हिरव्या मिरच्या, धने पूड, जिरे पूड व ३-४ मिरे
  • फोडणी साठी प्रत्येकी २ लवंगा , वेलची,दालचिनीचा साधारण २ इंच लांबीचा तुकडा
३० मिनिटे
२ ते ३ जणांसाठी

वाटण मसाला--  पुदिना , कोथिंबीर ,आले, लसूण पाकळ्या ,हिरवी मिर्ची ,धने पूड, जिरे पूड व मिरे हे सर्व साहित्य एकत्र वाटा. हे वाटण साधारण  १ वाटी घ्यावे.

पातेल्यात तेल तापवुन त्यात वर सांगितलेले फोडणिचे साहित्य घालावे.उभा चिरलेला कांदा यावर घाला. कांद्याचा रंग थोडासा बदलला की त्यावर धुवून,निथळवून घेतलेले तांदूळ घालावेत. गुलाबी होइपर्यंत तांदूळ परतावेत. त्यावर वाटलेला मसाला ,५ वाट्या पाणी , मीठ ,साखर घालावी. मंद आचेवर पातेल्यावर झाकण ठेऊन भात शिजवावा. शेवटी लिंबू पिळावे.

या भातामधे आवडत असल्यास थोडे काजू पण तळून घातल्यास चांगले लागतात.

आई