एकश्लोकी भागवत, महाभारत

दिगम्भांच्या लेखावरच्या प्रतिक्रियेतून एकश्लोकी रामायणाचा दुवा मिळाला.  तिथे असं कळलं की एकश्लोकी महाभारताबद्दल ऐकलं नाही. पण आम्ही लहानपणी जे श्लोक म्हणायचो त्यात एकश्लोकी रामायणासोबतच भागवत आणि महाभारत पण असायचं.  उच्चार जसे आठवले तसे लिहितेय.   जाणकार चुका दुरुस्त करतीलच.


भागवत


आदौ देवकी देवी गर्भजननम् गोपीगृहे वर्धनम्
माया पूतन जीविताप हरणम् गोवर्धनोद्धारणम्
कंसच्छेदन कौरवादी हननम् कुंतीसुत पालनम्
एतद् भागवतम् पुराण कथितम् श्रीकृष्णलीलामृतम्


महाभारत


आदौ पांडव धाष्ट्रराष्ट्र जननम् लाक्षागृहे वाहनम्
द्यूत स्त्री हरणम् रणेविचरणम् मस्त्यालये वर्तनम्
लीला गोहरणम् रणेप्रतरणम् संदिक्रिया जन्मनम्
एतद् भीष्मसुयोधनादि हननम् एतद् महाभारतम्


चूक भूल.......... माफ करावी.