ती मुक्त खळाळत हसते तेव्हा
लकेर जाते रानी
झाडांना सुचवित गाणी
ती झाडे गुणगुण गुणगुण करती
ऋतू बदलतो सारा
वासंतिक दिमाख न्यारा
तो वसंत येतो माझ्या दारी
निरोप घेउन हाती
की सुगंध देण्यासाठी?
श्वासात मिसळतो गंध तिचा
मी जगून घेतो थोडे
क्षणभरात सुटते कोडे
की तिच्यामुळे पालवी मनाची
अजुनी जिवंत आहे
ती खळाळेल तोवरी म्हणावे
अजुनी वसंत आहे !!!