ती डौलदार झाली...!
प्रेमात हार झाली,
वृत्ती उदार झाली.
बोटे रुसुन गेली;
बेचैन तार झाली
ज्या मैफिलीत होतो,
ती डौलदार झाली.
मदिरा सुटून आता,
दु:खे खुमार झाली
भुवया धनुष्य होत्या;
नयने कट्यार झाली.
विद्या प्रसन्न तरी का,
वाणी भिकार झाली?
झेंडे सफेद लावा,
ठिणगीच गार झाली.
-मानस६