ड्रूपलसाठी देवनागरी टंकलेखनाची सोय

ड्रूपल1साठी देवनागरी टंकलेखनाची सोय

ड्रुपलसाठी टंकलेखनाची ड्रुपल "इंडिक वेब इनपुट" ही सुविधा देताना मला अतिशय आनंद होतो आहे. काही मनोगतींनी रेटा लावल्याने फारश्या चाचण्या न करता थोड्या घाईतच ह्या सुविधेचे अकाली अनावरण करावे लागत आहे<sup>2</sup>.

एनट्रान्स ह्या देवनागरी टंकलेखनासाठी उपलब्ध पॅकेजमधील 'इंडिक वेब इनपुट' ह्या कार्यक्रमात 'फ्री जीएनयू लायसन्स' वापरून काही बदल करून टेक्स्टएरिया आणि टेक्स्टफ़िल्ड साठी ट्रॅन्ज़लिटरेशनची, लिप्यंतरणाची सोय देण्यात आली आहे. केवळ फोनेटिक कीबोर्ड ठेवण्यात आला आहे. 'इंडिक वेब इनपुटच्या' शोधकर्त्यांचा मी आभारी आहे. ड्रुपलशिवाय जूमला, टायपो किंवा अन्य सीएमससाठी देखील ही सुविधा किरकोळ बदल करून वापरता येईल, अशी आशा आहे.

ड्रुपल इंडिक वेब इनपुट इथून डाउनलोड करावे.अनज़िप करावे आणि सूचना वाचून आस्थापित करावे. शुभेच्छा!

त्रुटी आढळल्यास सांगाव्यात. दुरुस्ती आणि सुधारणा सुचवाव्यात. सगळ्यांनाच फायदा होईल.

चित्तरंजन भट

1. ड्रूपलचा उच्चार droo puhl असा

2. खरे तर रिच टेक्स्ट एडिटरसाठी संशोधन सुरू आहे. एकंदर ह्या
क्षेत्रांत होणारे काम बघून (bhashaindia.com ला भेट द्यावी) काही
दिवसात देवनागरी रिच टेक्स्ट एडिटरची गरज़ भासणार नाही असे दिसते. प्रत्येकाच्या
यंत्रावर बरहा, इंडिक आयएमई असल्यास हे सहज शक्य आहे. तसेच स्पेलचेकरसाठीदेखील थांबून-थांबून प्रयत्न सुरू आहेत. पण अनेक गोष्टींचा अभ्यास नसल्याने अनेक तांत्रिक बाबींत अगदी मुळात जाऊन सुरवात करावी लागत असल्याने वेळ लागतो आहे. जाणकारांनी मदत केल्यास हे कार्य लवकर होईल.