रव्याचे पुडींग

  • १ लिटर दूध, १मूठ बेदाणे,२ चहाचे चमचे वॅनिला साखर/१.५चहाचा
  • चमचा वॅनिला अर्क(इसेन्स),१/२ ते ३/४ वाटी रवा,१ अंडे,१चिमूट मीठ
  • १/४ चहाचा चमचा दालचिनी पावडर,१टे-स्पून मध,१ टे-स्पून साखर,
  • १/२ चमचा लोणी,सजावटीसाठी चॉकलेटच्या सळ्या
१५ मिनिटे
३,४ जणांसाठी

दुध उकळवत ठेवणे,त्यात बेदाणे घालणे,वॅनिला साखर घालणे,सारखे ढवळत राहणे,दूध उकळत आले की रवा घालत ढवळत राहणे. गुठळ्या होऊ  न देण्यासाठी सतत ढवळणे गरजेचे आहे.पुरेसे घट्ट झाले की रवा घालणे थांबवणे, १ अंडे फोडून घालणे,दालचिनी पावडर,मीठ घालणे .मिश्रण अजून घट्ट झाले की आचेवरून उतरवणे.

ज्या काचेच्या वाडग्यात हे पुडींग ठेवायचे आहे,त्याला लोणी लावून घेणे व हे मिश्रण त्यात घालणे.

(१५ मिनिटे एवढ्या कृतीला लागतात.पण..)

कक्ष तापमानाला आले की शीतकपाटात ६,७ तास ठेवणे.

खायला देण्याच्या आधी चॉकलेटच्या सळयांनी सजवणे.

जर्मनीत वॅनिला साखरेची छोटी पाकिटे मिळतात.(१पाकिट ८ ग्रामचे असते.)ते एक पाकिट या मिश्रणाला लागेल.

आणि याचे जर्मन नाव आहे: ग्रीस पुडींग.

ग्रीस=रवा....कसे वाटले?

अर्थातच त्सेंटा आजी