चकल्या (मिश्र पिठाच्या)

  • १ वाटी तांदुळ पिठी
  • १ वाटी कणिक
  • हळद,तिखट,हिंग,मीठ चविपुरते
  • तेल तळणी करता.
  • २ वाट्या पाणी
४५ मिनिटे
३०-३५ चकल्या

प्रथम तांदुळ पिठी व कणिक एकत्र करुन ठेवावे. मग २ वाट्या पाणी उकळवत ठेवावे त्यात चिमुटभर हळद,तिखट,हिंग व चविपुरते मिठ घालावे , २ चमचे (टेबल स्पून) तेल घालावे , पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करावा व त्यात पिठाचे मिश्रण घालावे. थोडे थंड होऊ द्यावे मात्र कोमट असतानाच चांगले मळावे व चकल्या पाडाव्यात व गरम तळणित तळुन घ्याव्यात.

भाजणी करणे अथवा विकत मिळणे शक्य नसल्यास अतिशय चांगला पर्याय आहे. चविला पण छान होतात.

सौ.आई.