बरेच झाले!

बरेच झाले म्हणायचे!
तरी जरासे कण्हायचे!


बघून झाले भले बुरे-
कशास आता फसायचे?


नको कुणाचे उणे दुणे;
हसून सारे पहायचे!


उरीच राहो उरातले;
उगी कुणाला कळायचे!


कणाकणाने जळूनही;
मरून अंती जळायचे!