सत्यसाईबाबा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

महाराष्ट्रासारख्या पुरोगामि राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सत्यसाईबाबाचे दर्शन घेतले असे वाचले दि.२१ ऑक्टोबर दै. लोकसत्ता . मुख्यमंत्र्याकडून हे अपेक्षीत वाटते का?


दोन तिन वर्षापुर्वी अं. नि. स. ने प्रकाशित केलेली एक सिड़ी पाहीली.त्यात एका सत्कार समारंभात सत्यसाईबाबा हवेत हात फीरवून त्याच हाताने परत जादुने अंगठ्या,सोनसाखळी काढुन देतात. सुरवातिला खरेच वाटते. नंतर स्लो मोशन मध्ये(अं. नि. स. ने दाखवल्यानुसार) पाहील्यावर असे दिसते की सत्कार समारंभात ज्यांचा सत्कार करायचा  त्यांच  नाव पुकारल्यावर तेव्यासपीठावर येतात . नंतर सत्यसाईबाबा यांचे विश्वासु सेवक  एक एक करुन बक्षीस घेवुन येतात.आणि ते  सत्यसाईबाबामार्फत बक्षीसाच्या खाली असलेल्या खोबणीतुन चलाखीने विश्वासु सेवक एका हाताने सत्यसाईबाबा ह्यांच्या देतात . नंतर सत्यसाईबाबा दोन पावल मागे होऊन हात गोल फिरवुन त्या हातातुन जादुने अंगठ्या,सोनसाखळी काढुन देतात. जोरदार टाळ्या पडतात . काय म्हणावे ते सांगा?