पुस्तके खरेदीचा निकष.


मनोगत वर 'अंतर्नाद' मासिकाच्या चर्चेत एक मुद्दा चर्चेत आला आणि तो म्हणजे पुस्तकांची खरेदी करताना अनेक निकषावर पुस्तकांची खरेदी होत असते. हाच निकष कपडे खरेदी करताना अथवा शुधाशांतीगृहात जाताना आपण करत नसतो.
मी स्वताही कोणतेही पुस्तक चाळताना प्रथम किंमत किती हेच पाहत असतो.

आजच्या काळात १०० रुपयाच्या आतली खरेदी ही काही खरेदी समजता येणार नाही, तरीही पुस्तकांचा विचार करताना किंमत किती हा विचारच आपल्या नकळतच मनात येत असतो.

या अनुषंगाने अजून एक विचार मनात येत असतो की जुने अथवा आपला ज्या पुस्तकातील रस संपला आहे अश्या पुस्तकांची विल्हेवाट कशी लावावी? जागेची अडचण लक्षात घेता यावरही विचार व्हावा असे सुचवावेसे वाटते.

पुस्तक विकत घेताना अजून कोणत्या निकषावर पुस्तकाची खरेदी होत असते, उदाहरणार्थ, संग्रही असावे असे खरोखरच वाटते काय?, पुस्तकांचे आदानप्रदान व्हावे काय? जवळच्या ग्रंथालयात पुस्तक मिळते काय? भेटीसाठी आपण पुस्तकांचा विचार करतो काय? इत्यादी इत्यादी.

आपले मत समजावून घ्यायला नक्कीच आवडेल.

द्वारकानाथ