ऑक्टोबर ३१ २००६

सोड आता!

सखे बोल ना, लाजणे सोड आता
मनाने मने वाचणे सोड आता!

नको आर्तशी आळवू भैरवीला
तड्याने तडे जोडणे सोड आता!

तुझ्या पायवाटेवरी टाकलेली
फुलाने फुले वेचणे सोड आता!

दिवे दोन जैसे तुझे नेत्र राणी
दिव्याने दिवे लावणे सोड आता!

खुळा मी, खुळी तू, खुळे प्रेम... वेडे...
खुळ्याशी खुळे बोलणे सोड आता!!!

Post to Feed

वाहवा..
छान!|सुचवण्या
सहमत..
मीही
विडंबन आवडलं
छान/ विषयांतराबद्दल माफी
आभार
मस्त मस्त आहे
मतला आणि मक्ता
अवांतर - व्यत्पत्ती?
मथळा ...
छान

Typing help hide