युरोपातले अस्पृश्य भारतीय?

मी,तू,आमे,तुमे,अनाव  हे कोणत्याही भारतीय भाषेच्या बोली भाषेचे वाटणारे शब्द एक युरोपीय समुदाय वापरतो ,या समाजाचे नाव 'रोम' आणि त्यांची भाषा रोमानी .रोम हा संस्कृत शब्द असू शकतो हा मला नवाच शोध लागला त्यांच्या विषयी माहिती इंग्लिश विकिपीडियावर माहिती वाचताना. सर्वच युरोपीय समुदायांनी या भारतीय वंशाच्या भटक्या समुदायाला दिलेली वागणूक वाचली की खेद वाटतो. त्यांपुढे  हिटलरच्या नाझी जर्मनीने 'रोमांची' ज्यूप्रमाणेच केलेली अमानुष कत्तल आणि 'पुरोगामी' राष्ट्रांनी त्यांच्या वर झालेल्या अन्याया कडे केलेलं दुर्लक्ष. आणि त्याही पलीकडे भारतातून परागंदा झालेल्या  मूळ भारतीय वंशाच्या माणसांबद्दल भारतीयांचं दुर्लक्ष. अधिक माहितीचे विकिदुवे


रोमानी भाषा


रोमानी शब्द


रोमा लोक