नोव्हेंबर २००६

प्राण थोडासा जळावा लागतो...

प्राण थोडासा जळावा लागतो...
मीलनासाठी दुरावा लागतो!

ताल का नुसतेच सांभाळायचे?
सूरही राणी जुळावा लागतो...

ऊब येण्याला जरा घरट्यामध्ये
जीव सारा अंथरावा लागतो...

रंगते ना काव्य शाईने गड्या
दर्दही थोडा झरावा लागतो!

राज्य जिंकायास का शस्त्रे हवी?
फक्त चरखा चालवावा लागतो!

पाकळ्या मिटल्या जरी माझ्या तरी
हाय, भृंगांना सुगावा लागतो...

प्रेम करतो मी पतंगासारखे
सिध्द करण्या जीव द्यावा लागतो

ही कशी प्रीती? असे नाते कसे?
रोज प्रेमाचा पुरावा लागतो!

ठेवली खाली जरा मी लेखणी
वादळालाही विसावा लागतो!

Post to Feed

वा!
सुंदर
मस्तच
वा प्रसाद वा!
ठेवली खाली जरा मी लेखणी
मस्त
वा!
सुरेख!
आवडली
अप्रतिम
शेवटचे
मानाचा मुजरा!
वा!
सुरेख
आभार
ऊब

Typing help hide