चहा एके चहा......

आमच्या लहानपणी (म्हणजे सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी) लहान मुलांनी चहा, कॉफी, असली उत्तेजक पेये पिण्यास वडील माणसांचा खूप विरोध असायचा. मुलांनी दूधच प्यायला हवे असा आग्रह असे. त्यावेळी चहा कॉफीचे (बहुधा) दुष्परिणाम सांगणारे एक बडबडगीत मी ऐकले होते. ते असे:


चहा एके चहा, डोळे उघडून पाहा.


चहा दुणे कप, बोलू नको गप.


चहा त्रीक बशी, अक्कल जाते खाशी.


चहा चोक चमचा, तू नव्हे आमचा.


चहा पंचे साखर, कमी जाते भाकर.


चहा सक किटली, अब्रू सारी विटली.


चहा सत्ती गाळणं, गटारातलं लोळणं.


चहा अठ्ठी कोको बाबा, तुझी संगत नक्को बाबा.


चहा नव्वे कॉफी, पिणारा तो पापी.


चहा दाही चहा प्यायला, थप्पड मारता प्राण गेला.


(हे बडबडगीत असल्यामुळे सुसंबद्धता व तर्कसंगत विचार यांची फारशी अपेक्षा ठेवू नये.)


मनोगतींपैकी कोणी वरील बडबडगीत ऐकले आहे का याबद्दल मला कुतूहल आहे.