आवळ्याची चटणी

  • ८ आवळ्याचा कीस, २ चमचे खोबऱ्याचा कीस, चवीनुसार मीठ, साखर, लिंबू,
  • हिरवी मिरची, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
१५ मिनिटे
४ जणांकरिता

सगळे जिन्नस एकत्र वाटून घ्यावे, झाली चटणी तय्यार. 

ऐच्छीक - वरून खमंग हिंगाची फोडणी द्यावी. ह्या चटणीत कडू सोडून बाकी साऱ्या रसाची चव आहे.

माझ्या प्रयोग शाळेतील यशस्वी प्रयोग