भारताची राज्यघटना आणि आपण

नमस्कार,


          स्वतंत्र भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० ला देशाला अर्पण करण्यात आली. तेव्हापासुन ते आतापर्यंत घटनेतील कलमांत अनेक बदल झाले(करण्यात आले). मुळ घटना आणि आता कलमांत बदल केलेली घटना यात खुप फरक आहे .


डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते- कुठलेही संविधान परिपुर्ण असु शकत नाही ,असत नाही. या देशाला स्वतंत्र राष्ट्र म्हणुन सुरुवात करण्यास हे संविधान योग्य आहे. हे संविधान वस्तुनिष्ठ आहे̮अवचिक आहे आणि देशाची एकता टिकवून धरण्याच्या क्षमतेचे आहे. एवढे करुन जर या संविधानाखाली चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याचा अर्थ हे संविधान वाईट होते असे न ठरता संविधान राबवण्याऱ्या माणसांचा तो दुबळेपणा होता असेच म्हणावे लागेल.


आपणास राज्यघटनेविषयी अधिक माहीती असल्यास सांगा?


डॉ. आंबेडकरांचे वरिल विचार आज खरे झाल्याचे वाटतात का?


काहीजण मध्येच उठतात म्हणतात घटन बदला हे बरोबर आहे का?


आपली राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे का?


आपला


कॉ.विकि