रक्त आणि प्लेटलेट्स देणे - एक आवाहन

मला असं वाटतं की मनोगताच्या माध्यमातून मुंबई आणि आसपास राहणाऱ्या आणि रक्तदान करण्यास तयार असणाऱ्या मनोगतींची एक यादी बनवावी जी प्रसंगी उपयुक्त ठरेल. विशेषतः प्लेटलेटसाठी .(तंतुकणिका)


आधीच प्लेटलेट वेगळ्या  करायला खूप पैसे पडतात( मुंबईत किमान ५०००-१०००० रु.) त्या ३ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवता येत नाहीत. त्या फार लांबून आणल्यास प्रवासात त्यांची हानी होते.या कारणांमुळे नातेवाईकांसाठी दररोज उठून नवा प्लेटलेटदाता कुठून शोधावा हा प्रश्न असतो. (सर्वांनाच धडपडे आणि मदत करणारे मित्र/ दाते त्यावेळी उपलब्ध असतीलच असे नाही.


अशी काही यादी - नावे ,रक्तगट आणि पत्ते यांसह तयार होऊ शकते का?