ऐकला साधा तुझा जो हुंदका

ऐकला साधा तुझा जो हुंदका

ऐकला साधा तुझा जो हुंदका
तेवढा होता पुरेसा बोलका

मी कसा ह्याला पसारा म्हणू?
बरसतो प्राजक्त केव्हा नेटका?

ह्या तुझ्या पत्रांमधे रेंगाळतो
एक कोरा गंधा थोडाथोडका

मी कधी दिसतो इथे,दिसतो तिथे
माणसे म्हणतात मजला 'घोळका' !

(प्रेमवीरांनी कशाला आणल्या?
त्याच त्या आकाशगंगा, तारका)


शब्द झाले रेशमी अन देखणे!
भावनांना वाव नाही नेमका


-नीलहंस