नोव्हेंबर २० २००६

कबीर


मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला
जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला

कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे
मलाच ती गाठ सोडण्याचा कधी पुरेसा न धीर झाला

असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते
सहज तुझे नाव घेतले श्वास श्वास हा बेफिकीर झाला

पदोपदी भास होत आहे , जणू तुझा स्पर्श होत आहे
सदेह भेटायला तुला भक्त हा खरोखर अधीर झाला

मला न पर्याय राहिला ! लेखणीस केले तुझ्या हवाली
तुला न पर्याय राहिला ! शब्द शब्द माझा कबीर झाला

Post to Feed

वा!
सहमत
मीही
अप्रतिम
सुरेख
विशेषण संपलेत
अगदी खरंय!
हेच!
गाठ
सुरेख
१,३,५
सुरेख!
जियो!!
अगदी सहमत
छान!
मस्तच
समृद्ध गज़ल
फार सुरेख
कधीच नाही सुटावयाचा
सुंदर
सुरेख.

Typing help hide