दह्यातली दाण्याची चटणी

  • १ वाटी दाण्याचं कूट
  • १ वाटी दही
  • चवीप्रमाणे तिखट, मीठ, साखर
१५ मिनिटे
३-४

सोप्पं आहे. पंधरा मिनिटं म्हणजे म्होप झाली...

दाण्याचं कूट, दही एका वाडग्यात घ्यायचं. मस्तपैकी कालवायचं. ते करत असताना चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि साखर घालावी, परत कालवावं. आणि काय??

?
?
?
?

मिटक्या मारत, पोळी पासून ते धिरड्यापर्यंत कशाच्याही बरोबर खावं!

अधिक टिपेत काय बरं लिहावं??? कुठल्याही "मधल्या वेळेच्या" पदार्थाबरोबर ही चटणी झकास लागते, अपुनका तो बोले तो एकदम फेवरीट...

हा हा हा