कणकेचे लाडू

  • २ वाट्या कणिक,१.५ वाटी पीठीसाखर,१ वाटी साजूक तूप
  • वेलची पूड,बेदाणे,बदामाचे काप
३० मिनिटे
१५ ते १७ मध्यम आकाराचे लाडू

कणकेत १,२ चमचे तूप घालून सूक्ष्मलहरींवर  ८०० वॅट वर २ मिनिटे गरम करावे,बाहेर काढून चांगले एकत्र करावे.परत थोडे तूप घालून सुक्ष्मलहरीवर २ मिनिटे ठेवावे,बाहेर काढून पीठ सारखे करावे,असे ४,५ वेळा करावे.कणिक भाजल्याचा खमंग वास आला की कोमट होऊ द्यावे,त्यात पीठीसाखर,वेलची पूड,बदाम,बेदाणे  घालून सारखे करावे,हवी असल्यास अजून साखर घालावी व लाडू वळावेत.

याच प्रमाणे बेसन,मैदा,नाचणीचे पीठ,साबुदाणा पीठ इ. चे लाडू करता येतात.
ही पीठे खमंग भाजायला खूप वेळ आणि उर्जा लागते,त्याला मायक्रोवेवचा हा पर्याय उत्तम आहे.
मैद्याचे लाडूही छान होतात!

माझे पाकप्रयोग