मनोवृत्ती की विकृती?

कानपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटम्बना झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली,तणाव निर्माण झाल्याची बातमी नुकतीच वाचली.ई-सकाळमधील एका बातमीनुसार दगडफ़ेकीला घाबरून एक व्यक्ती पळत-पळत रस्ता ओलांडत असताना वाहनाखाली चिरडून मरण पावली.माणसे जखमी होणे,सार्वजनिक  मालमत्तेचे नुकसान होणे या नित्याच्या आणि चिरपरिचित घटना देखील घडतच आहेत.


राट्रीय पातळीवर मान्यता आणि आदर प्राप्त झालेल्या नेत्यांचा जीवित असताना अथवा मरणोतर अपमान झाल्यास, सर्वसामान्य जनता आणि सार्वजनिक  मालमत्ता यांची अशी हानी  करणे यातून कोणाचे आणि नेमके काय भले साध्य होते? 'चोर सोडून संन्याश्याला सुळावर चढवण्याचा' हा प्रकार आहे असे मला तीव्रपणे वाटते.ही आपली मनोवृत्ती म्हणायची की विकृती?यावर कधीच काहीही उपाय सापडणार नाही का?