हा नवा गोंधळ कसला.

आम्हा विद्यार्थ्यांना कॉलेजातल्या असंख्य ऍक्टिव्हीटीज मधून वेळ मिळाला व गप्पा मारायला कोणी मराठी मंडळी नसल्याचे जाणवले की मनोगताची तिव्रतेने आठवण येते.
मग कुठल्यातरी कॅफे वरून खिशाला/पॉकेटमनीला चाट देवून मनोगतावर यावे तर काहीतरी नविन प्रक्रिया झालेली असते.
आज दैनंदिन लेखवर टिचक्या मारून मारून बोटे दुखली पण समोर यायचे ते कोरे पान; ऍज इफ- आज काही लेखन मनोगतावर कोणी केलेलेच नाही. ३० नोव्हेंची तारीख निवडायला गेल्या महिन्यावर टिचकी मारता, महिना सरळ ऑक्टोबर वर जातो.
बराच वेळ प्रयत्न केल्यावरही हा गोंधळ काही सुटेना. आज संकेतस्थळावरून येणारे प्रतिसादही पूर्वी 'धिमी गती के समाचार' यायचे तसे येतात.
नियमीत भेट देणाऱ्या मनोगतींनाही असेच अनुभव येतात का?
ह्याच कॅफेवरून इतर संकेतस्थळे धडाधड उघडतात.
आपला अनुभव कळेल का?