मसाला चहा.

  • २ चमचे चहाची भूकटी. (शक्यतो, ब्रुक बाँड रेड लेबल)
  • ४ चमचे साखर.
  • एक कप दूध.
  • एक कप पाणी.
  • एक इंच आलं.
  • पाव चमचा वेलचीची भूकटी.
  • एक इंच दालचीनी.
  • ८-१० दाणे बडीशोप.
१५ मिनिटे
दोघांसाठी.

वरील सर्व जीन्नस एकत्र करून गॅसवर उकळवावे. चांगले  उकळल्यावर गॅस बंद करून पातेले २-३ मिनीटे झाकून ठेवावे. नंतर दोन कपांमध्ये गाळून घ्यावे. 

वाफाळणारा चहा कपात ओतल्यावर, पिण्या आधी, त्याचा सुगंध श्वासावाटे आस्वादावा. नंतर तृप्त मनाने घोट-घोट चहाचा आस्वाद घ्यावा. 

स्वानुभव.