मसाला ताक

  • २५० ग्राम आंबट गोड दही
  • जिरेपूड, धनेपूड
  • मीठ
  • थंडगार पाणी
१५ मिनिटे
२ जण

सगळ्यात आधी दहयामधे थंडगार पाणी मिसळून रवीने फ़ेस येईपर्यंत मस्त घुसळून घ्यावे. २ चिमूट जिरेपूड, २ चिमूट धनेपूड  आणि २ चिमूट मीठ घालून परत घुसळा. मसाला ताक तय्यार!!!

(आपल्या सिंहगडावरच्या ताकाची आठवण झाल्यावाचून राहणार नाही.)

दही शक्यतो ताजे असावे.

आमचे 'अहो' ;)