शिंगाडा पीठ लाडू

  • शिंगाडा पीठ १ वाटी
  • दाण्याचे कूट अर्धी वाटी
  • साजूक तूप ७-८ चमचे
  • पीठीसाखर पाऊण वाटी
१५ मिनिटे
२ जण

कढईत शिंगाडा पीठ व साजूक तूप घेऊन मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजणे. भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट व साखर घालून चांगले ढवळणे.  कोमट असताना लाडू वळणे. भाजत असतानाच साजूक तूप थोडे थोडे घालणे, म्हणजे शिंगाडा पीठ पूर्णपणे तूपात भिजले का नाही ते कळेल. वर साजूक तूपाचे प्रमाण दिले आहे, पण कमी-जास्त लागेल, कारण पीठ तूपात भिजले पाहिजे. शिंगाडापीठ तूपात भिजल्यावर तपकिरी दिसते पण भाजून झाल्यावर थोडा रंग बदलतो. रंग बदललेला तसा कळत नाही. अंदाजाने नीट बघून भाजावे.

बेसन लाडवाप्रमाणेच ह्या लाडवाची पद्धत आहे. हे लाडू खूप खमंग लागतात. १ वाटीत छोटे छोटे १० लाडू होतात.

रोहिणी

उपासाला हे लाडू करतात. एरवी पण करायला हरकत नाही, कारण छान खमंग लागतात.

सौ आई