उकड-प्रकार २

  • १ वाटी तांदुळाचे पीठ,आंबट ताक १ मोठा ग्लासभरून,१ कांदा,२,३ लसूण पाकळ्या,थोडे आले
  • तेल,मोहरी,हिंग,१,२ हिरव्या मिरच्या,कढीपत्ता,मीठ,साखर
१५ मिनिटे
२ जणांना

तांदुळाचे पीठ ताकात पातळसर भिजवून घ्या,गुठळ्या मोडा, त्यात मीठ व किंचीत साखर घाला.कांदा चौकोनी चिरा,लसूण पाकळ्यांचे उभे पातळ काप करा.आल्याचेही उभे पातळ काप करा.
तेल गरम करा,त्यात मोहरी घाला,तडतडली की हिंग,कढीपत्ता,मिरच्या घाला.कांदा व लसूण घाला,झाकण ठेवून २ वाफा येऊ द्या. नंतर तांदुळाचे ताकात भिजवलेले पीठ घाला, ढवळा.झाकण ठेवून २,३ वाफा येऊ द्या.
शिजली की खोलगट बशीत वाढून आळे करून त्यात कच्चे तेल घाला. गरम गरम खा.

आताच रोहिणीची उकड वाचली आणि आठवण झाली,म्हणून मनोगतींसाठी इथे ही पण एक उकड पाकृ देत आहे.
(या प्रकारात हळद घालत नाहीत व कांदा,लसूण शिजताना घालतात.)

माझी आई