अरुण साधूंचा सत्कार

नमस्कार ,


सध्याच महाराष्ट्र साहित्य परिषदेतून ८० व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री अरुण साधू यांच्या सत्कार समारंभाला हजेरी लावून येतोय.


साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावरचा साधूंचा हा पहिलाच जाहीर सत्कार. मसाप चे अध्यक्ष श्री द. मा. मिरासदार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.


मराठीतील अनेक मान्यवर मंडळी आज कार्यक्रमाला होती. विठ्ठल वाघ, रामदास फुटाने आणि अनेक अन्य.


आपल्या भाषणात श्री अरुण साधू यांनी मराठी विषयी आपले मत मांडले. संपूर्ण भाषण येथे देता येणार नाही. मात्र बदलत्या काळात मराठीची जपणूक करताना पूर्वग्रह व पांडित्याचा अनाठायी आग्रह बाजूला ठेवावा लागेल असं त्यांचं मत.


कार्यक्रमा नंतर श्री साधू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना मनोगत आणि मनोगताने चालवलेले अखंड साहित्य संमेलन याची माहिती दिली. तसेच आजची पिढी संगणकाच्या क्षेत्रातही मराठी टिकवून ठेवण्याची धडपड करते आहे असं म्हटले. त्या नंतर त्यांना "माझे शब्द" या संकेत स्थळाबद्दल माहिती दिली. त्यावर त्यांनी मला सविस्तर लिही असं म्हणून स्वतःचा विरोप पत्ता आवर्जून दिला.


आज याच कार्यक्रमातच माझे आवडते कवी श्री विठ्ठल वाघ यांची सुद्धा भेट झाली. एकंदरीत कार्यक्रम झकास झाला.


नीलकांत