कृपया ऑर्कूट विषयी थोडी माहिती हवी

आदरणीय मनोगतींनो,


माझी बरीचशी अकाउंट्स मित्रांनीच काही काळ हॅक केली होती बहुधा! असो.


मला आपणा सर्वांची थोडी मदत हवीय. ऑर्कुटबाबत


१) ऑर्कुट हे नाव कसे पडले


२) सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे नेमके काय? त्या कधी सुरू झाल्या? त्यात काही भारतीय खासियत असलेल्या अशा साईट्स आहेत का?


३) ऑर्कुटवर सरसकट बंदी घालणे भारतात शक्य आहे का? त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत का? अशी बंदी घालणे योग्य आहे का?


४) सायबर पोलिसिंग ही नवी संस्कृतिरक्षकांची भूमिका योग्य आहे का?


५) जगात कुठे ऑर्कुटवर सरसकट बंदी आहे का?


६) ऑर्कुटवर शिवाजी महाराज आणि अलीकडे ब्राह्मण स्त्रियांविषयी अश्लील लिखाण याशिवाय काही अजून वादग्रस्त यापूर्वी होते का? किंवा अजून आहे का?


७) ऑर्कुटवरील वादग्रस्त वेबपेजेस काढून टाकण्याची पद्धत काय?


८) यापूर्वीही ब्लॉग वर बंधने भारतात आणली गेली होती का?


एकूणच याबाबत आपणास काय वाटते ते कृपया कळवावे.


सोप्या भाषेत तांत्रिक अवडंबर न माजविता सर्वांना कळेल अशा शब्दात मुद्रित माध्यमात (वृत्तपत्रात - मराठी) ऑर्कुटविषयी काय लिहता येईल.


धन्यवाद.