नानकटाई

  • रवा -१ कप
  • मैदा-१ कप
  • चनाडाळीचे पीठ(बेसन)-१ कप
  • साखर-१ कप
  • तुप-१ कप
  • मीठ-एक चिमुटभर
१ तास
लहान आकाराच्या -३४

तुपात साखर विरघळून त्यात इतर सर्व साहित्य मिसळणे. हे मिश्रण ३० मिनिट झाकून ठेवावे. ओवन ३७५ डिग्री फॅरनहाईट(१९० डिग्री सेल्सिअस) साठी प्रिहीट करावे. लहान आकाराच्या नानकटाई बनवून १५ मिनिटासाठी बेक कराव्यात. १० मिनिटानंतर थंड झाल्यावर  खायला तयार!!

या सोड्यावीना बनवलेल्या नानकटाई एकदम खुसखुशीत व ठिसूळ होतात. आइसक्रीम स्कुपने(मराठी शब्द??) नानकटाई बनवल्यास सर्व एकाच आकाराच्या होतात.

इथे आजकाल नाताळासाठी सगळ्यांकडे वेगवेगळ्या कुकीज बनवतात, या भारतीय कुकीज वेगळ्या चवीमुळे आमच्या फिरंगी मित्रांना आवडतात.

सौ.आशाभाभी