लिखाण

रोज त्यांना नवे लिखाण हवे
त्यात सुखदु:ख सम-प्रमाण हवे!


फक्त निर्झर नकोत शब्दांचे...
सूरगंगेतले उधाण हवे!


बावरे पाहुनी हसू माझे
दु:ख माझे असे अजाण हवे!


मी कसे थांबवू सुखास इथे?
- रोज त्याला नवे ठिकाण हवे!


घे नवे ज्ञान तू शिकून जरा...
फक्त हातात का पुराण/कुराण हवे?


- कुमार जावडेकर, मुंबई