शब्द माझ्या अंतरीचे आरसे

आत काही दाटले अंधारसे
शब्द माझ्या अंतरीचे आरसे


ही अवस्था कोणती सांगू कसे? 
नाही तिचे कोणीच केले बारसे


जाऊ दे ना ही लढाई संपली
संपले कोठे लढाऊ वारसे


मध्यरात्रीला निमाला तो दिवा
वातीस उरले तेल नव्हते फारसे

स्मरते मला ती वेळ सायंकाळची
दोन तारा बोलल्या गंधारसे

--अदिती
(१८.११.०६)
टीप : ही कविता गज़लॉईड म्हणून खपेल का?
ही गाजराची पुंगी नाही पण मुळ्याची पुंगी नक्की वाटते आहे :)
ह. घ्या.