बीन तुपाचे लाडु (झटपट लाडु)

  • १ वाटी खवा,१ वाटी रवा,१ वाटी खोबरे (ओले किंवा सुके)
  • २ वाटी पिठीसाखर , बेदाणे, काजु, पिस्ता, बदाम, वेलची , जायफळ पावडर २ चमचे
१ तास
१० लाडु

खवा ,रवा ,खोबरे  हे सर्व मिक्स करा. हे मिश्रण कुकरच्या भांड्यात घाला.कुकरमध्ये ३ शिट्ट्या करा. जर का खोबरे ओले असेल तर भांडयावर झाकण ठेवा, सुके खोबरे असेल तर भांड उघडे ठेवा व शिट्टी काढा. हे मिश्रण गार करा. नंतर यात १ वाटी पिठीसाखर घाला. यात सर्व सुका मेवा मिक्स करा‍. जायफळ ,वेलदोडा पुड थोडी जास्त घाला.याचे लाडु बांधा. मिश्रण जास्त गार झाले तर दुधाचा हात लावुन लाडु वळा.

 

  

चविला हे लाडु खुप छान लागतात, आणि होतातही पटकन. जरुर करुन पहा.  

एक कुकरी शो