लिंबाचा सॉस

  • ४ लिंबे , २ वाट्या साखर , मीठ चवीनुसार
  • जीरेपुड १ चमचा , तिखट १ चमचा
  • उकळुन गार केलेले पाणी ४ वाट्या
१ तास
४ ते ५ जणांसाठी

प्रथम लिंबांना  कुकरमध्ये ३ शिट्ट्या काढुन घ्या. लिंबु चिरायचे नाहीत, तशाच शिट्ट्या काढायच्या. नंतर कुकर गार झाल्यावर लिंबातील सर्व बीया काढा.

 लिंबु , मीठ , साखर , गरम करुन गार केलेले पाणी (पाणी बघुन घालावे.) , जीरेपुड  हे सर्व मिक्सरमध्ये फिरवा. नंतर सॉस  पातळ /दाट  कसा हवा त्याप्रमाणे पाणी मिसळा.गॅसवर थोडा वेळ शिजवुन घ्या. लिंबाचा सॉस तयार. ४ ते ५ दिवस टिकेल.

  • हा सॉस फ्रिजमध्ये राहतो.
  • गोडाचे आप्पे किंवा इतर तिखट पदार्थांसोबत किंवा नुसता पोळीबरोबर ही  चांगला लागतो.
  • हयाची आंबट -गोड चव खुप छान लागते.
मिनु