जानेवारी २००७

वेळ झाली

वेळ झाली

पापण्यांनी पापण्यांशी बोलण्याची वेळ झाली
बोललो नाही कधी ते सांगण्याची वेळ झाली

जा सखे तू ,शब्द माझा मोडण्याची वेळ झाली
का हव्याशा बंधनाला तोडण्याची वेळ झाली?

वेळही झाला  कितीसा डाव हा मांडून राया
एवढ्यातच हाय सारे हारण्याची वेळ झाली

सांजवेळी पाकळ्यांना मिटुन घ्या माझ्या फुलांनो
उमलले तुमच्यासवे ते विसरण्याची वेळ झाली

आसवांना वाहण्याची एकदा संधी मिळाली
तीच ती दु:खे नव्याने सोसण्याची वेळ झाली.

 -सोनाली जोशी

Post to Feed

वा
छान
मतला
सुंदर
एकदा
सुंदर
छान!
पापण्यांनी पापण्यांशी बोलण्याची वेळ झाली

Typing help hide