कांदा उत्तप्पा

  • तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राईस)
  • उडीद डाळ अर्धी वाटी
  • अर्धा मोठा कांदा
  • चिरलेली कोथिंबीर १ वाटी
  • तिखट हिरव्या मिरच्या ३-४
  • चवीपुरते मीठ, व तेल
१५ मिनिटे
२ जण

 

तांदुळ व उडीद डाळ दुपारी १ ला पाण्यात भिजत घालणे वेगवेगळ्या पातेल्यात. रात्री १० ला मिक्सर/ग्राइंडर मधे बारीक वाटून घेणे. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ ला उत्तप्पा करणे. उत्तप्पा करताना त्यामध्ये कांदा थोडा जाड चिरून घालणे. शिवाय मिरच्यांचे बारीक तुकडे , चिरलेली कोथिंबीर, व चवीप्रमाणे मीठ घालून तवा चांगला तापल्यावर थोडे तेल घालून कालथ्याने पसरवणे व नंतर तव्यावर जाड उत्तप्पे घालणे. उत्तप्पा घालून झाल्यावर ५-६ सेकंदाने थोडे तेल उत्तप्पाभर पसरवून नंतर ५-६ सेकंदाने उलटणे. म्हणजे दोन्हीकडून खरपूस भाजला जाईल.

रोहिणी  

ओल्या नारळाची दह्यातली पातळ चटणी व तिखट सांबाराबरोबर खाणे.

स्वानुभव