आई मला नको ग अभ्यास

आई मला नको ग अभ्यास


फक्त आजचा दिवस, आई मला नको ग अभ्यास


बागेत जाऊ


कारंजे पाहू


खेळूया मजेत ॥ १ ॥ आई मला नको ग अभ्यास


सागरी जाऊ


किल्ले करू


खेळूया वाळूत ॥ २ ॥ आई मला नको ग अभ्यास


पक्षांशी बोलू


झडात खेळू


लपूया वेलीत ॥ ३ ॥ आई मला नको ग अभ्यास


चित्रे काढू


रंगही भरू


रंगू या  रंगात ॥ ४ ॥ आई मला नको ग अभ्यास


सहलील जाऊ


मजा मजा पाहू


लुटूया आनंद ॥ ५ ॥ आई मला नको ग अभ्यास


मातीची फुले


कागदी फूले


करूया झोकात ॥ ६ ॥ आई मला नको ग अभ्यास


खाऊ कर नवा


मला जसा हवा


मी करीन मदत ॥ ७ ॥ आई मला नको ग अभ्यास