जानेवारी
९
२००७
निसटलेले क्षण
विस्कटलेले मन
आता पुनर्जन्माची वाट पाहणे आले
***
फुलपाखरांचे रंग
न्याहाळण्यात दंग
पाय कधी घसरला कळलच नाही
***
हिरवे जर्द रान
कोकिळेची तान
माझाच गाव अचानक माझ्यासमोर
***
चिंचा, बोरे, आवळे
चिमण्या, खारी, कावळे
बालपण नक्की केव्हा संपले?
***
वाळवंटातले मृगजळ
डांबरी रस्त्यावर आले
पण त्याच्या मागे धावणे सुरूच..;
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
चांगली!
प्रे. प्राजु (बुध., १०/०१/२००७ - ००:५८).
वा!
प्रे. कुमार जावडेकर (बुध., १०/०१/२००७ - १२:२८).
