पिझ्झा....

  • मैदा - २ कप
  • यीस्ट - १ टी. स्पून.
  • सखर - १/२ चमचा
  • भाज्या - हिरवी ढब्बू मिरची १, कोबी चिरून -१ कप, कांदा १,
  • टोमॅटो - १, असल्यास - पिवळी ढब्बू मिरची १,
  • मोझोरेला चीज (खिसलेले) २ कप, मीरे पूड, मीठ, टोमॅटो सॉस १ कप
२ तास
२-३ जण

पिझ्झा बेस :

१. प्रथम १/२ कप पाणी घेऊन त्यात यीस्ट, आणि साखर घालून १० मिनिटे तसेच ठेवावे. यीस्ट पाण्यात फुलून येते.

२. हे यीस्ट चे पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून मैदा लागेल इतके पाणी घालून मळून घ्यावा. खूप घट्ट किंवा खूप सैल भिजवू नये. साधारण मैदा २० मिनिटे मळावा. आता हा मैद्याचा गोळा एका हवा बंद डब्यात ठेवून घट्ट झाकण लावावे आणि १ तास भर बाजूला ठेवावा. तासाभाराने हा ग़ोळा दुप्पट आकाराचा झालेला असेल. परत एकदा मळून तो पुन्हा ४५ मिनिटे तसाच डब्यात घालून ठेवावा. आता हा बेस तयार झाला.

टॉपिंग्ज :

सगळ्या भाज्या साभारण चौकोनी आकारात कापून घ्याव्यात. खूप बारिक चिरू नयेत. साधारण अर्धवट शिजवून घ्याव्यात.

बेकिंग ट्रे ला तूप/तेल/बटर (लोणी नव्हे) लावून घ्यावे. त्यात हव्या त्या आकाराचा मैद्याचा गोळा घेऊन तो तळहाताने हव्या तेवढ्या जाडीचा पसरवून घ्यावा. जास्त जाड ठेवू नये. त्यावर प्रथम टोमॅटो सॉस लावावा, मग सगळ्या भाज्या पसरवून घ्याव्यात. त्यावर मोझोरेला चीज पसरावे.

ओव्हन ३५० ०c  ला प्री- हीट करून मग त्यात हा पिझ्झा १०-१२ मिनिटे बेक करावा. वरून मीरे पूड घालून त्रिकोणी आकारात कापून खाण्यास द्यावा.

ऑरिगॅनो असेल तर ते ही वरून मीरेपूड प्रमाणे घालावे.

 

१. टॉपिंग्ज कोणतेही घातले तरी चालते.

२. भारतीय चव हवी असेल तर चीज ऐवजी त्यावर थोडा कोणताही मसाला टाकावा... आणि बेक करण्या आधी आलं-लसूण-मिरची एकत्र वाटून त्यावर पसरावे.

३. मी यामध्ये साधारण ८ इंच व्यासाचे ३ पिझ्झे केले. आणि जाडी साधारण १/४ ते १/२ इंच ठेवली होती. म्हणजे ते बेक झाल्यावर १ ते १ १/४ इंच जाडीचे झाले.

४. माझा स्वयंपाक कोथिंबीरीशिवाय होत नाही... मी ती ही घातली वरून.. छानंच लागली.

तुम्ही ही करून बघा आणि प्रतिसाद नक्की कळवा.

कुठे तरी वाचलेले... मग स्वतःचे प्रयोग..