मक्याचे सलाड

  • अमेरिकन मक्याचे दाणे (१ वाटी)
  • गाजर १, कोबी थोडासा, टोमॅटो १, कांदा १, फ़्लावर २-३ कोंब,
  • १ लिंबू, साख़र, मीठ, कोथिंबीर
१५ मिनिटे
४ जण

प्रथम अमेरिकन मका थोड्याश्या तेलावर परतवुन घयावा म्हणजे त्या मक्याचा थोडा रंग बदलेल. आणि वरील सर्व भाज्या बारीक  चिरुन घ्याव्या. (कोबी चायनीज साठी चिरतो तसा चिरला तरी चालेल, म्हणजेच लांब लांब चिरावा)
वरील सर्व जिन्नस एका भांड्यात एकत्र करावे व त्यात चवीनुसार लिंबु पिळावे, चवीनुसार मीठ, साखर घालावी , कोथींबीर बारीक चिरुन घालावी व सर्व एकत्र करावे. आवडी नुसार आंबट करावे. हे नुसते किंवा पोळिबरोबर किंवा जेवणात भाताबरोबर खावे.. मी कधी कधी नुसतच खाते.

ह्या सलाड मध्ये मका न घालता पण नुस्ती कोशिंबीर म्हणुन वापरता येते. पण ह्या सलाड मध्ये दहि घालु नये. ते लिंबाबरोबर च चांगले लागते. कुणाला हवे असल्यास त्यात दाण्याचे कुट घालु शकता.

माझे प्रयोग