फेब्रुवारी
५
२००७
उमलून वांझ माझे सारे वसंत गेले
करुनी मला शिशिरही, बघ, नापसंत गेले
चित्कारतो न हल्ली क्षितिजास पाहुनी मी
सांगून सत्य त्याचे मज बुध्दिमंत गेले
साकेत ना मिळाला, साकी तरी मिळाली
पेल्यात वारुणीच्या मग खेद-खंत गेले
माडी म्हणू नका, ही आहे पवित्र वास्तू
पावन करून तिजला मुल्ला-महंत गेले
आहे अटळ, मनुष्या, उतरंड रौरवाची
काही मरून गेले, काही जिवंत गेले
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?
करुनी मला शिशिरही, बघ, नापसंत गेले
चित्कारतो न हल्ली क्षितिजास पाहुनी मी
सांगून सत्य त्याचे मज बुध्दिमंत गेले
साकेत ना मिळाला, साकी तरी मिळाली
पेल्यात वारुणीच्या मग खेद-खंत गेले
माडी म्हणू नका, ही आहे पवित्र वास्तू
पावन करून तिजला मुल्ला-महंत गेले
आहे अटळ, मनुष्या, उतरंड रौरवाची
काही मरून गेले, काही जिवंत गेले
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
वा
प्रे. मानस६ (मंगळ., ०६/०२/२००७ - १४:४२).
वा क्या बात आहे.
प्रे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (मंगळ., ०६/०२/२००७ - १४:५७).
चांगली गज़ल
प्रे. जीवन जिज्ञासा (मंगळ., ०६/०२/२००७ - १५:००).
गझल आणि दुर्बोधता
प्रे. मिलिंद फणसे (बुध., ०७/०२/२००७ - १६:०४).
ऊत्तम गझल!
प्रे. पुलस्ति (मंगळ., ०६/०२/२००७ - १६:२३).
वा..
प्रे. केशवसुमार (मंगळ., ०६/०२/२००७ - १६:४६).
छान
प्रे. कारकून (मंगळ., ०६/०२/२००७ - २१:५१).
काही मरून गेले, काही जिवंत गेले
प्रे. चित्त (बुध., ०७/०२/२००७ - १३:११).
