माणसे (गझल)

वखत वेळ कुठला विसरती माणसे
बघत खेळ भलता गुंगती माणसे

तो जरी हारला, मी जरी जिंकलो
नाव त्याचेच का घोकती माणसे?

तीच ती भांडणे,त्याच त्या कारणे
बदलते शस्त्र, ना बदलती माणसे

दूर असता किती मखमली भासती
जवळ जाताच पण टोचती माणसे

लावती जीव जे सोडती साथ का?
माणसांनाच ना समजली माणसे

(जयन्ता५२)