राघवदास लाडू

  • चार वाट्या हरभऱ्याच्या डाळीचा रवा
  • एक वाटी तूप
  • अर्धा वाटी खवा
  • दोन वाट्या साखर
  • एक वाटी पाणी
  • एक चमचा काजू
  • एक चमचा बेदाणे
  • एक छोटा चमचा वेलदोडा पूड
अडीच तास
भरपुर

रवा दुधामध्ये ओलसर होईपर्यंत भिजवून ठेवावा. तुपावर रवा खमंग भाजावा‌. साखरेत पाणी घालून रव्याच्या लाडवाप्रमाणे पाक करुन रवा,खवा व काजू-बेदाणा-वेलदोड्याची पूड पाकात टाकावी.मिश्रण एकसारखे करून दोन तासांनी लाडू वळावे.

साखर चवीनुसार कमीजास्त करावी

सौ. नलिनीमामी