प्रेम

प्रेम तीर्थ वा धाम नाही
बस, विरंगुळा, काम नाही

भान हरपणे प्रीत मागे
तेव्हढे तिचे दाम नाही

एकनिष्ठ राहू कसा मी?
कृष्ण पूजितो, राम नाही

हो, पवित्र आहे - मनाने
(देह तेव्हढा ठाम नाही)

पाप मानवांचा न मक्ता
इंद्र काय बदनाम नाही?

भैरवी करा मैफिलीची
जी विराम, निजधाम नाही