पेच

शराब कबाब शेरात नको
प्रतिसादीही  पेचात नको

कुणी कोणत्या संघात नको
अंगावरी  जुनी कात नको

शब्द वापरू ऐसे काही
शब्द कुणाचे कोशात नको

या  देवांची घेतो नावे
(धाडू  मजला नरकात नको)

घ्या पुढारी नि घ्या बैलोबा
भेदभाव हा प्राण्यात नको

 तारा गारा शोधुन आणा
क्रोध  तंत्रा शास्त्राचा नको

पाडावी  गझलेवर गझल
(पाडावी कवितेवर कविता)
क्वालीटीची पण बात नको!

- कारकून(*मात्राविषयी साशंक)
       (सोनाली जोशी)
*