फेब्रुवारी १७ २००७

शरीराने मला जेव्हा जरा रुग्णालयी नेले

शरीराने मला जेव्हा जरा रुग्णालयी नेले
मनाने त्याच वेळी का मला देवालयी नेले

मुलींच्या बायका झाल्या मुलांचेही बुवे झाले
तसे कित्येकदा मीही मला वृद्धालयी नेले

कसा पाऊस होऊनी तुला भेटायला आलो
कसे ह्या उष्ण श्वासाने पुन्हा मेघालयी नेले

नशेने सोडले कोणा फरक इतकाच केला की
कुणा मद्यालयी नेले कुणा मंत्रालयी नेले

इथे फिर्याद माझी मीच साक्षीदार माफीचा
गुन्हे माझेच मी अंती तुझ्या न्यायालयी नेले

- माफी

  यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?
मंत्रालयी
सहमत!
वा..
छान
आपली
सुरेख काव्य! उत्तम अभिव्यक्ती!!
आवडली
मस्त!
हवामानशास्त्राचा अभ्यास चांगला दिसतो.
वा!
छान
लगागागा लगागागा
वा!

Typing help hide