गव्हाची खीर

  • १/२ कि.खपली गहू (शक्यतो खपली
  • पाऊण कि̱. चांगला गूळ
  • १ नारळ
  • १/२ वाटी खसखस
  • १०-१२ वेलदोड
  • बेदाणे
  • काजू
  • १ वाटी गव्हाचा रवा
  • दूध
दीड तास
७ ते ८ जणांसाठी

खीर करावयाच्या आदल्या दिवशी गहू पाणी लावून चांगले सडावेत व कोंडा काढून टाकावा‌. सडून घेतलेले गहू रात्री भिज़त टाकावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी पातेल्यास तेलाचा हात लावून गहू शिज़त टाकावेत. गहू शिज़ण्यास बराच वेळ लागतो̱. गहू अर्धवट शिज़त आल्यावर त्यात रवा घालावा व आणखी शिज़वावे. गहू अगदी मऊ शिज़ल्यावर ते पळीने ठेचावेत. मग त्यात गूळ, बेदाणे, काज़ू, नारळ खिसून किंवा बारीक तूकडे करुन, वेलची पूड व खसखस भाज़ून किंचित कुटून घालावी व थोडा वेळ शिज़वून, खाली उतरवून ठेवावी. वाढवयाच्या वेळी वरून थोडे दूध व तुप घालून वाढावी.

गव्हाच्या रव्या ऐवज़ी १ वाटी तांदूळही वापरता येतात, फ़क्त ते गव्हा प्रमाणे रात्री वेगळे भिज़त घाला.

आई