फेब्रुवारी २१ २००७

परके झाले बाबांचे घर

परके झाले बाबांचे घर
आता सासर हे माझे घर

सासू आई, बाप सासरे
दीरनणंदा हेच सहोदर

लग्न साधना, घर हे मंदिर
तुम्ही माझे पतिपरमेश्वर

शेतेविहिरी गायगुरे ही
इथले अवघे जीवन सुंदर

ठरला अपुला मरणाचा क्रम
मी आधी अन तुम्ही नंतर

लौकिक जीवन केवळ क्षणभर
माझेतुमचे प्रेम निरंतर

Post to Feed

छान
पति परमेश्वर !
कविता
वा ..
छान
खूप छान
मर्त्य परमेश्वर
चांगली आहे पण

Typing help hide